प्रेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रेम ही एक भावना आहे.

प्रेम म्हणजे दोन जिवांमध्ये असलेलं एक निर्मळ नात.[१]

प्रेम म्हणजे हे एक गोड विष आहे. [२]

काही स्वरुपे[संपादन]

प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे: १) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते. २) प्रेम - हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो - ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भागीनिप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी. ३) आदर - हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. ह्यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी - विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणार्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच! ४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय. ५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: